म्हसळा ग्रामीण रुग्णालयाच्या सुविधांत सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील -पालकमंत्री आदिती तटकरे


[ads id='ads1]

अलिबाग,जि.रायगड - म्हसळा तालुक्यातील सर्वसामान्य माणसाला दर्जेदार आणि मोफत रुग्णसेवा मिळण्यासाठी खासदार सुनिल तटकरे यांनी शासन दरबारी विशेष प्रयत्न करून म्हसळा शहरात भव्य असे 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारले आहे. गेल्या दोन वर्षात हे रुग्णालय कार्यान्वित करण्यासाठी आणि त्याचा दर्जा उंचाविण्यासाठी पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी अथक मेहनत घेऊन रुग्णालयात स्वतंत्र कोविड सेंटर, रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड, ऑक्सिजन कॉंसेंट्रेटर, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती, नवीन एक्स-रे मशीन, नवी रुग्णवाहिका, करोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र,औषध पुरवठा आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत आणि यापुढेही येथे आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज येथे दिली.
      

म्हसळा ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध करून दिलेल्या बायो मेडिकल वेस्ट प्लांटचे उद्घाटन तसेच 12 ड्युरा ऑक्सिजन सिलेंडरचे लोकार्पण पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
       

यावेळी जेष्ठ नेते अलीशेठ कौचाली, समीर बनकर, सभापती छाया म्हात्रे, उपसभापती संदीप चाचले, पंचायत समिती सदस्य मधुकर गायकर, उपविभागीय अधिकारी अमित शेडगे, तहसिलदार समीर घारे, पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे, गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे, प्रकल्प अधिकारी व्यंकट तरवडे, बांधकाम अभियंता गणगणे, पाणी पुरवठा अभियंता युवराज गांगुर्डे, डॉ.कराड, माजी सभापती नाजीमभाई हसवारे, नगराध्यक्षा जयश्री कापरे, रेश्मा काणसे, शगुप्ता जहांगीर, शांताराम गायकर, संजय कर्णिक, शाहीद उकये,सतीश शिगवण, महेश घोले, किरण पालांडे, शेखर खोत, सलीम बागकर, प्रकाश गाणेकर आदी मान्यवर पदाधिकारी व आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
 [ads id='ads2]  

 पालकमंत्री आदिती तटकरे यांनी करोना कालावधीत आरोग्य सेवा केलेल्या मात्र सध्या सेवेतून कमी केलेल्या स्थानिक कंत्राटी कामगारांच्या आणि नवीन सेवा कर्मचारी भरती बाबत समस्या जाणून घेतल्या. म्हसळा तालुक्याप्रमाणेच तळा तालुक्यात लवकरच ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. 


शासन दरबारी तालुका स्तरावर ग्रामीण रुग्णालय उभारणी करण्यात येणार असल्याची कार्यवाही करण्यात आली असून तळा तालुक्यात तातडीने कार्यवाही करण्यासाठी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी एमइपीएल च्या संचालिका श्रीमती सुधा म्हात्रे यांना सूचित केले. 

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️