बीड - मागील भांडणाच्या कारणावरुन पारनेर ता. पाटोदा येथील जातीवादी लोकांनी गावाजवळील पारधी कुटुंबावर हल्ला करून तेथील नागरीकांना काठ्याने अमानुष मारहाण केल्याची घटना काल शनिवारी दि २६ रोजी रात्री १२.३० च्या सुमारास घडली. या मारहाणीत मानु उर्फ सिद्धांत अरूण काळे या एक वर्षाच्या मुलाच्या डोक्यावर काठीचा मार लागल्याने त्याचा मृत्यु झाला.
[ads id='ads1]
तर अनेक गंभीर असून ते बीडच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. या घटनेची माहिती समजताच वंचीत बहुजन आघाडीचे भटके-विमुक्तांचे राज्य समन्वयक अँड.डॉ. अरुण जाधव यांनी घटना स्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.
सदर घटनास्थळी पुन्हा हल्ला होण्याच्या भीतीमुळे घटनास्थळी पोलीस सोडता कुणीही उपस्थित नव्हते. चोरीच्या संशयामुळे ही घटना घडली आहे. शेळी चोरी करताना पकडल्यावर तुमच्या माणसाने आमच्या घरात येऊन आमच्या माणसाला चाकूने भोसकल असे म्हणत काठी व लथाबुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत एका निष्पाप लहान मुलाला काठी लागून तो गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान बालकाचा मृत्यू झाला.विषय गंभीर असून सुद्धा पोलीस प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची प्रतिबंधक कारवाई न झाल्यामुळे आज एका निष्पाप लहान मुलाचा जीव गेला आहे अस ते म्हणाले. सदर घटनेची योग्य ती चौकशी करून पीडित कुटुंबाला त्वरित न्याय मिळवून द्यावा अशी मागणी अँड.जाधव यांनी केली.
तसेच या हल्ल्यामध्ये पीडित कुटुंबाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होऊन जीवनावश्यक वस्तूंची नासधूस केली. त्यामुळे पीडित कुटुंबाला न्याय देऊन तात्काळ १५ लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी केली.
"पारध्यांनी चुकी किली तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुलीस कारवाई का नाही केली. शिक्षा होईल पण गुन्हा सिद्ध व्हायच्या आधी चोर ठरवून तुमी त्यांची घर जाळणार हा कसला न्याय ?. सदर कुटुंब हे शेतकरी कुटुंब आहे.
स्वमालकीच्या जमिनीत जमिनीत शेती करून आपल्या कुटुंबाची गुजराण करत आहे. या कुटुंबाकडे स्वतःच्या शेळ्या जनावरे आहेत. वाद हा दोन कुटुंबामधील असताना सुद्धा सम्पूर्ण गाव मिळून जर हल्ला करत असेल तर हे जातीय तालिबानी मानसिकतेच लक्षण आहे. गावात पारधी नको असतील तर त्यांना बाहेर काढायला कायदा, प्रशासन आहेत . घर जाळून तालिबानी दहशतवादयांगत त्यांचा न्यायनिवाडा कशासाठी करावा. जाळणाऱ्यांनी काय क्षणासाठी पारध्यांसारखं आपलं घर कुणीतरी जाळलं तर तुमी काय केलं असत हे स्वतःला विचारलं पाहिजे.
घर जाळलं तरी पाटोद्याच्या पोलीस प्रशासनांन पाहिजे त्या गंभीरतेन विषय न हाताळल्यान पारधी म्हणजे चोरच ही नजर स्वयंम घोषित शिक्षित असलेल्या समाजानं जरा बदलाय पाहिजे. अस मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी लोकाधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापू ओहोळ, सचिन भिंगारदिवे, दिपक माळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.