मध केंद्र योजनेचा लाभार्थ्यांनी लाभ घ्या ; लाभार्थ्यांनी मध व्यवसाय सुरु करण्यापूर्वी या गोष्टीं जाणुन घ्या..


नांदेड - महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशापालन) योजना संपूर्ण राज्यात कार्यान्वित झाली आहे. लाभार्थी व्यक्तीचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे तसेच त्यांच्याकडे स्वंताच्या मालकीची शेती असावी.
[ads id='ads1] 

तो 10 वी उत्तीर्ण असावा तसेच त्यांच्याकडे किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे 1 एकर शेती जमीन किंवा भांडे तत्वावर घेतलेली शेती जमीन, लाभार्थ्यांकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादन बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता किंवा सुविधा असावी तसेच 10 दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे.

निवड झालेल्या लाभार्थ्यांनी मध व्यवसाय सुरु करण्यापूर्वी मंडळास बंधपत्र लिहुन देणे अनिवार्य असून मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील. 

अधिक माहितीसाठी खादी व ग्रामोद्योग मंडळ जिल्हा कार्यालय उद्योग भवन औद्योगिक वसाहत शिवाजी नगर नांदेड येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️