रावेर प्रतिनिधी (राजेश रायमळे) तालुक्यातील तामसवाडी गावाच्या परिसरात पावसाचे पाणी तसेच घनकचरा साचत असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन डासांचे प्रमाण वाढत आहे.
[ads id='ads1]
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मागील महिनाभरापासून पावसाचा जोर कायम असल्याने जागोजागी साचलेले पावसाचे पाणी व घनकचरा यांमुळे डासांनी अंडी घालुन तेथे परिसरात डासांचे प्रामण वाढत असून या डासां मुळे लोकांमध्ये विषेश करुन लहान बालकांमध्ये आजाराचे प्रमाण वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
मगील एक-दिड वर्षापूर्वीच गावामध्ये डेंग्यू चा पेशंट आढळून आलेला होता. आता यांच वर्षी त्यांच आजाराची साथ चालु असल्यामुळे सध्या डेंग्यू मलेरिया चिकनगुणीयाची साथ आपल्याकडे येते की काय? अशी भीती जनतेला निर्माण झालेली आहे.