अकोला - युपीएससी परीक्षा ही कठीण परीक्षा आहे. परंतु सातत्यपूर्ण परिश्रम व प्रयत्नाने विद्यार्थी आय.ए.एस होवू शकतो. मोठे आव्हान स्विकारताना अनेक अपयश येतात. त्याला घाबरुन न जाता आत्मविश्वासाने सामोर जावे, अशा शब्दात जिल्ह्यातील आयएएस परीक्षा उत्तीर्ण आश्विन राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
[ads id='ads1]
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वर्ष 2020 च्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला. त्यात अकोला जिल्ह्याचे आश्विन राठोड हे 520 क्रमांकावर उत्तीर्ण झाले आहे. त्यांचा आज जिल्हाधिकारी (प्रभारी) सौरभ कटीयार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, शालेय शिक्षण व गुणवत्ता विकास कक्षाचे गजानन महल्ले, अधिकारी व कर्मचारी यांच्यासह आश्विनी राठोड यांचे आई व वडील उपस्थित होते.
यु.पी.एस.सी. अत्यंत कठीण परीक्षा असून या परीक्षेत आश्विन राठोड यांनी यश संपादन केले ही, जिल्ह्यासाठी गौरवास्पद बाब आहे. त्यांच्या या यशामुळे यु.पी.एस.सी. परीक्षेची पूर्व तयारी करणाऱ्या उमेदवारांना प्रेरणा मिळेल, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी (प्रभारी) सौरभ कटीयार यांनी काढले.
सातत्यपूर्ण परिश्रम व प्रयत्नाने विद्यार्थी आय.ए.एस होवू शकतो. मोठे आव्हान स्विकारताना अनेक अपयश येतात. त्याला घाबरुन न जाता आत्मविश्वासाने सामोर जावे, अशा शब्दात आश्वीन राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.