वर्धा - डेंग्यु , मलेरिया यासारखे आजार डास चावल्यामुळे होत असून डासाची उत्पत्ती ही घानपाणी, गटार, कचरा यापासुन होत असते. शहरातील नाल्याची सफाई त्याचबरोबर कच-याची विल्हेवाट होत नसल्यामुळे जिल्हयात डेंग्यु आजाराच्या रुग्णात वाढ होत आहे
[ads id='ads1]
तसेच डेंग्यु आजाराने रुग्णांचे मृत्यु सुध्दा होत आहे. यासाठी नगर पालिका व नगर पंचायतींनी नाल्या व गटाराच्या स्वच्छेतवर भर देऊन घनकच-याची विल्हेवाट बरोबर न लावणा-या कंत्राटदारावर कारवाई करण्याच्या सूचना कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी विश्रामगृह येथे डेंग्यु आजार नियंत्रणाबाबत आढावा बैठकित सर्व नगर पालिकांना दिले.
बैठकिला जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. सचिन तडस, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रभाकर नाईक, नगर पालिका प्रशासनचे मनोजकुमार शहा, वर्धा नगर पालिकाचे मुख्याधिकारी विजय देवळीकर व जिल्हयातील सर्व नगर पालिका व नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांची उपस्थिती होती.
डेंग्यु आजारावर नियंत्रण आणन्यासाठी शहरामध्ये तसेच ग्रामीण भागामध्ये नागरिकांनी आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे. तसेच नगर पालिकांच्या व आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांनी प्रत्येक घरी भेटी देऊन घराच्या छतावर टाकाऊ वस्तू , टायर, कुलर यासारख्या वस्तुचे विल्हेवाट लावण्यासाठी नागरिकांना सांगावे. त्याचबरोबर दररोज फवारणी करण्याच्याही सूचना श्री तिवारी यांनी यावेळी दिल्यात.
डेंग्यु आजराच्या रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत सर्व शासकिय रुग्णालयात करावे. आवश्यक लागणा-या औषधसाठा उपलब्ध नसल्यास तात्काळ खरेदी करण्याच्या सूचना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांना दिल्या. यावेळी रुग्णालयात रिक्त असलेल्या पदाचा आढावा सुध्दा त्यांनी यावेळी घेतला.