जळगाव - जिल्ह्यात घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त (पूर्व) परिक्षा 2020 च्या सकाळ सत्राची परीक्षा सकाळी 11 ते 12 या वेळेत संपन्न झाली. या परिक्षेसाठी जिल्ह्यातून 11 हजार 463 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यातील 7 हजार 540 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेसाठी हजर असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी दिली आहे.
[ads id='ads1]
या परीक्षेत 3 हजार 923 विद्यार्थी गैरहजर होते. जिल्ह्यातील 35 परीक्षा उपकेंद्रावर झालेल्या या परीक्षेसाठी 1130 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सर्व परीक्षा उपकेंद्रावर पोलीस प्रशासनामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता, अशीही माहिती निवासी उपजिल्हाधिकारी श्री राहूल पाटील यांनी दिली आहे.