अलिबाग,जि.रायगड - राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्य आयुक्त श्री.कांतीलाल उमाप यांच्या आदेशानुसार कोकण विभाग ठाणे चे विभागीय उपायुक्त सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक श्रीमती किर्ती शेडगे, ठाणे उपअधीक्षक श्री.चारुदत्त हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.11 व 12 सप्टेंबर 2021 रोजी रोहा तालुक्यातील गोपाळवठ धनगरवाडी, कारवीने धनगरवाडी व कारवीने ठाकूरवाडी येथील अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रावर रायगड व ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल 2 लाख 6 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
[ads id='ads1]
या धाडीदरम्यान एकूण सहा गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी एक वारस तर 5 बेवारस गुन्हे असून एक आरोपी ताब्यात घेतला आहे. तसेच 80 लिटर हातभट्टी दारू आणि सात हजार 400 लिटर रसायनही जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती श्री.आनंद अं.पवार, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,मुरुड विभाग यांनी दिली आहे.