अखेर वनविभागाच्या सतर्कतेमुळे १९ नागांनी घेतला मोकळा श्वास ; शेतातील फॉर्म हाऊसमध्ये असलेले १९ जिवंत नाग वनविभागाच्या ताब्यात

(विशेष प्रतिनिधी - अ‍ॅड बसवराज होसगौडर)
सांगली - दिनांक १६/०८/२०२१ रोजी वनविभागाचे निशुल्क दुरध्वनी क्रमांक १९ २६ वरुन मौजे कापरी ता.शिराळा, जि.सांगली हद्दीमधील उत्तम दिनकर निकम यांचे शेतामधील फॉर्म हाऊस मध्ये नाग बंदिस्त करुन ठेवले असून त्याचे प्रदर्शन होणार असलेची खबर मिळाली होती . 
[ads id='ads1]
सदर माहितीनुसार वनपरिक्षेत्र अधिकारी शिराळा यांचे चमूने घटनास्थळाची तपासणी केली असता काही नागरिक पळून जाताना आढळले. कापरी हद्दीतील उत्तम दिनकर निकम शेतातील फॉर्म हाऊसची तपासणी केली असता मडकी व पोते / पिशव्यासह १९ जिवंत नाग ( वन्यजीव ) मिळून आले . 

याबाबत वन्यजीव ( संरक्षण ) अधिनियम १ ९ ७२ चे कलम ०९ अन्वये प्र.गु.रि.क्र . ०४ / ०५-२०२१ दिनांक १६/०८/२०२१ जारी केला आहे . सदर कारवाई वनक्षेत्रपाल , वनपाल , वनरक्षक व वनमजूर शिराळा , वनक्षेत्रपाल फिरते पथक सांगली , मानद वन्यजीव रक्षक सांगली यांचे चमूने केली आहे . जप्त नागाची वैदयकीय तपासणी पशुवैदयकिय अधिकारी , इस्लामपूर यांचेमार्फत करणेत आली आहे .

सदर प्रकरणाचा पुढील तपास श्री.विजय माने , उपवनसंरक्षक (प्रा.) ,सांगली वन विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री.विजय गोसावी , सहा.वनसंरक्षक (वनीकरण) सांगली हे करीत आहेत . वन्यजीव अपराध संबंधी माहिती वनविभागाचे निशुल्क क्र . १ ९ २६ या हेल्पलाईनवर देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️