जळगाव - जिल्ह्यात पावसाळ्याच्या सुरवातीपासूनच जळगाव जिल्ह्यासह खानदेशावर अवकृपा करणाऱ्या वरुणराजाने मंगळवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी हजेरी लावली. तीन आठवड्यांचा खंड पडल्यानंतर पाऊस आल्याने पिकांना दिलासा मिळाला. मात्र, या दोन-तीन आठवड्यांमध्ये उडीद, मुगाच्या पिकांचे मात्र व्हायचे ते नुकसान होऊन गेले आहे.
[ads id='ads1]
महाराष्ट्र राज्यात जुलैअखेर पडलेल्या पावसाने अन्य भागात पुराचे थैमान घातलेले असताना नंदुरबार नाशिक धुळे व जळगाव जिल्हा खानदेश कोरडाच होता.
मात्र पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत सरासरीच्या ४० टक्केही पाऊस झालेला नसल्याने खानदेशावर कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. दुबार पेरणी कशीबशी वाचलेली असताना पावसाने पुन्हा तीन आठवडे ओढ दिली.
त्यामुळे उडीद, मुगाचे पीक जवळपास हातचे गेले. अन्य पिकांची आस या पावसावर होती. सोमवारी रावेर तालुक्यातील तालुक्यातील काही भागात पाऊस झाल्यानंतर मंगळवारी सकाळपासूनच पावसाने तुरळक स्वरूपात हजेरी लावली. जळगाव जिल्ह्यातील बहुतांश भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. या थोड्या पावसाने पिकांना काहीसे जीवदान मिळाले आहे.
अमळनेर तालुक्यात पाऊस यावर्षी खरीप हंगामात तब्बल दोन महिन्यात प्रथमच अमळनेर शहरासह ग्रामीण भागात पाऊस झाला.गेल्या जून ,जुलै या दोन महिन्यात शेतशिवारात साधे डबके ही भरले नव्हते.आँगस्टच्या अर्धा महिना उलटला खरीप हंगामाची आशा मावळली.
मात्र पिण्याच्या पाण्याचा आणि गुरांचा चाराचा प्रश्न शेतकरी बांधवांना पडला होता. दिनांक 17 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास कळमसरे ,मारवड परिसरात पावसाला सुरुवात झाली.यानंतर अमळनेर शहरासह ग्रामीण भागात पाऊस झाल्याने शेतकरी राजा सुखावला आहे.
खरीप हुकला आता रब्बीची आशा तालुक्यात सर्वत्र दोनदा पेरणी ,कापूस लागवड होऊनही अडीच महिने पाऊस नसल्याने शेतकरी बांधवाच्या हातातून खरीप हंगाम गेला आहे. तर परिसरात सदस्यस्थितीत गुरांना चारा उपलब्ध होत नसल्याने शेतकरी सह पशुपालक यांचे मात्र हाल होत आहेत.आज झालेल्या पावसाने रब्बी हंगामाची आशा पल्लवित झाल्या असून असाच पाऊस होत राहिल्यास चाराची समस्या मिटेल असेही मत यावेळी शेतकरी बांधवानी व्यक्त केले.
जोरदार पावसाची आवश्यकता तालुक्यात बऱ्याच ठिकाणी पाणी टंचाई भेडसावू लागली आहे.यामुळे असेच तीन चार पाऊस झाल्यास पिण्याच्या पाणीचा प्रश्न सुटेल . तर खरीप हातातून गेल्याने रब्बीची आशा पल्लवित झाल्याने चिंतातुर झालेला शेतकरी राजा खरीप हंगामात हजारो रुपयांचा खर्च करून वाया गेल्यावरही अडीच महिन्यांनी पावसाने हजेरी लावल्याने सुखावला होता.