मयुर गोल्ड, काझी वाडा , रविवार पेठ येथील दुकानावर छापा टाकुन त्यांच्याकडील अवैद्यरित्या बाळगलेले आठ वाघ / बिबट नख्या जप्त...

(विशेष प्रतिनिधी - अ‍ॅड बसवराज होसगौडर) 
सातारा - काल सोमवार दि . १६.०८.२०२१ रोजी सखी लेडीज शॉपी कृष्णा नाका सावित्री बिल्डींग कॉर्नर कराड येथे दिनेश बाबुलालजी रावल हा वाघ / बिबट नख्या विक्रीसाठी येणार असल्याबाबतची गुप्त माहीती मिळाली होती . सदर माहितीनुसार मा. सहा. वनसंरक्षक( वनी व कॅम्पा) , वनपरिक्षेत्र अधिकारी कराड , इन्स्पेक्टर , वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो मुंबई , वनरक्षक , मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे स्पेशल सेल , वनविभाग कराड वनपरिक्षेत्र , कोरेगाव वनपरिक्षेत्र व सातारा वनपरिक्षेत्र यांच्या चमूने घटनास्थळी धाड टाकुन आरोपी दिनेश बाबुलालजी रावल यांना ताब्यात घेवुन झडती घेतली असता त्यांच्याजवळ अवैद्यरित्या दोन वाघ / बिबट नख्या व एक गळ्यातील लॉकेटमधील वाघ / बिबट नख सापडले . 
[ads id='ads1]
त्यानंतर उपरोक्त नमुद चमूने अनुप अरुण रेवणकर यांच्या मयुर गोल्ड, काझी वाडा , रविवार पेठ येथील दुकानावर छापा टाकुन त्यांच्याकडील अवैद्यरित्या बाळगलेले आठ वाघ / बिबट नख्या जप्त करण्यात आल्या . याबाबत वन्यजीव ( संरक्षण ) अधिनियम १ ९ ७२ चे कलम ९ , ३ ९ , ४४ , ४८ अ , ४ ९अ , ४ ९ब , ५०,५१ व ५२ अन्वये प्र.गु.रि.क्र . १४/२०२१ दिनांक १६/०८/२०२१ जारी केला आहे . 

सदर कारवाई प्रकरणी मा.उपवनसंरक्षक महादेव मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली मा.सहा.वनसंरक्षक महेश झांजुर्णे , वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार नवले , वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो मुंबई चे इन्स्पेक्टर डोकी आदीमाल्ल्य्या , मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे , मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे स्पेशल सेलचे वनरक्षक आकाश सारडा तसेच वनपाल आनंदा सवाखंडे , वनरक्षक रमेश जाधवर , अरुण सोळंकी , संजय लोंखडे , प्रशांत मोहीते , अशोक मलप , साधना राठोड , मंगोश वंजारे , बाबुराव कदम , भारत खटावकर , सचिन खंडागळे , राजकुमार मोसलगी , राम शेळके हे सहभागी झाले होते .

सदर प्रकरणाचा पुढील तपास मा . श्री . महादेव मोहीते , उपवनसंरक्षक , सातारा वनविभाग यांचे मार्गदर्शनाखाली मा . श्री . महेश झांजुर्णे , सहा. वनसंरक्षक ( वनी व कॅम्पा ) हे करीत आहेत . वन्यजीव अपराध सबंधी माहिती वनविभागाचे टोल फ्रि क्र .१ ९ २६ या हेल्प लाईन वर देण्याचे आवाहन करण्यात येत आहे .

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️