अकोला - सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागांतर्गत इंग्रजी माध्यमाच्या सर्व एकलव्य मॉडेल रेसीडेशियल स्कुलमध्ये सहावीत नियमीत प्रवेश तसेच इयत्ता सातवी ते नऊवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या रिक्त जागा भरणेकरिता अनुसूचित व आदिम जमातीच्या विद्यार्थ्याकडुन ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.
[ads id='ads1]
विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांनी ऑनलाईन प्रवेशाकरीता https://admission.emrsmaharashtra.com या लिंकवर आवेदनपत्र भरावे. आवेदनाकरीता मागील वर्षाचे गुणपत्रक अपलोड करावे, तसेच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याकरिता विद्यार्थ्यांचा सरल पोर्टलवरील स्टुडण्ड आयडी (Student ID) माहिती असणे आवश्यक आहे. आवेदनपत्र ऑनलाईन भरण्याची अंतिम मुदत दि. 31 ऑगस्ट पर्यंत राहिल. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण आल्यास 8788442237 या नंबरवर संपर्क करावा.
आदिवासी विदयार्थ्यांना एकलव्य रेसिडेशियल पब्लीक स्कुलमध्ये प्रवेशपरिक्षा कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील वार्षिक परिक्षेच्या गुणाच्या आधारे प्रवेश देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये जे विद्यार्थी पाचवी मध्ये प्रविष्ट होते आणि सद्या विदयार्थी शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये सहावीमध्ये प्रवेशित झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना एकलव्य निवासी शाळेत सहावी मध्ये प्रवेश घेण्याकरिता मागील वर्षाचे पाचवीचे गुणपत्रक ऑनलाईन आवेदन पत्रासोबत अपलोड करावे. तसेच शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता सातवी मध्ये प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्यांचे मागील वर्षाचे सहावी वर्गाचे गुणपत्रक आठवीमध्ये प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्यांचे मागील वर्षाचे सातवी वर्गाचे गुणपत्रक आणि नववी मध्ये प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्यांचे मागील वर्षाचे आठवी वर्गाचे गुणपत्रक अपलोड करावे लागेल.
शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये ज्या विद्यार्थ्यांची आकारिक मूल्यमापन व संकलित मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. अशा विद्यार्थ्यांचे संबंधित नऊ विषयांचे (मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान/परिसर अभ्यास समाजिकशास्त्रे, कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षक) प्रत्येकी 100 पैकी गुण विचारात घेऊन एकुण 900 गुणांचे गुणपत्रक सादर करावे.
शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये ज्या विद्यार्थ्यांची आकारिक मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. अशा विद्यार्थ्यांचे आकारिक मूल्यमापनाचे विषयनिहाय प्राप्त गुण 100 मध्ये रुपांतरित करुन संबंधित इयत्तेचे नऊ विषयांचे (मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान/परिसर अभ्यास समाजिकशास्त्रे, कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षक) प्रत्येकी 100 पैकी गुण विचारात घेऊन एकुण 900 गुणांचे गुणपत्रक सादर करावे. गुणपत्रक अपलोड करण्यापुर्वी गुणपत्रीका 900 गुणांचे असल्याची खात्री करावी. त्यामुळे शाळेकडुन गुणपत्रक प्राप्त करुन घेताना गुणपत्रक तपासून घेण्यात यावे. शाळेकडुन श्रेणी प्रदान केलेले गुणपत्रक मार्कामध्ये रुपांतरित करुन घ्यावे. श्रेणी नमुद कलेले गुणपत्रक प्रवेशासाठी ग्राह्य धरले जाणार नाही, अशी माहिती पत्रकाव्दारे कळविण्यात आली आहे.