लातूर (वार्ताहर) लातूर येथील सर्पमित्र अस्लम सय्यद यांनी नागपंचमी निमित्त जिवंत साप पकडून सापाची पूजा करण्यास लोकांना सांगितले, तसेच लोकांकडे पैसे मागत असलेलं व्हिडीओ काल सोशल मीडियावर वायरल झाला. या विडिओची माहिती सांगलीतील प्राणीमित्र अॅड बसवराज होसगौडर यांना प्राप्त झाली.
[ads id='ads1]
या बाबत माहिती घेऊन संशयित अस्लम सय्यद यांच्या विरुद्ध नागपूर वन विभाग, PCCF ( प्रधान मुख्य वन्यजीव संरक्षक ) यांच्याकडे वन्यजीव स्वरंक्षण कायदा 1972 अनुसार तक्रार केली आहे. महाराष्ट्र मध्ये नागपंचमी सण मोठया प्रमाणावर साजरी केली जाते. या सणानिमित्त काही सर्पमित्र आणि गारुडी लोक पैसे कमावण्यासाठी जिवंत साप पकडून सापाची दात काडून, अमुनष्य छळ करतात.
त्यानंतर घरोघरी जाऊन लोकांना साप दाखवून सापाला हळदी कुंकू लावून पूजा करायला सांगतात, सापाला दुध पाजायला सांगून लोकांकडे पैसे मागतात असं दरवर्षी महाराष्ट्र मध्ये विविध ठिकाणी अश्या गोष्टी घडत आहे. मुळात साप कधी दुध पीत नाही किंबहुना दुध पिल्याने सापाच्या जिवास धोका आहे. तसेच हळदी कुंकू केमिकल पासून बनवल्याने सापाच्या अंगावर टाकल्याने सापाला केमिकलचा त्रास होतो.
असं चुकीचे, अंधश्रद्धा समाजात पसरवून गारुडी आणि काही सर्पमित्र पैसे कमवत आहे. म्हणून दर वर्षी महाराष्ट्र वन विभाग नागपंचमीनिमित्त परिपत्रक काडून जण जागृती करत असतात. तरीही गारुडी आणि काही सर्पमित्र छुप्या पद्धतीने जिवंत साप पकडून सापाचे खेळ करत आहे. कोणतेही जिवंत पकडणे, डांबून ठेवणे, खेळ करणे, प्रदर्शन करणे भारतीय वन्यजीव स्वरंक्षण कायदा 1972 अनुसार गुन्हा आहे. कलम 51 अन्व्ये तीन ते सात वर्षा पर्यंत शिक्षा आणि 10, 000 ते 25, 000 रुपये पर्यंत दंड असल्याचे अॅड बसवराज होसगौडर यांनी सांगितले.