९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनी शासकीय सुट्टी जाहीर करा - अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेकडून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना निवेदनातून मांगणी..

नाशिक वार्ताहर (सुशिल कुवर) आज दि. २ ऑगस्ट २०२१ रोजी नाशिक जिल्हाधिकारी मा. श्री. सूरज मांढरे यांना दि. ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात यावी यासाठी मागणी केली आहे.
जागतिक आदिवासी दिवस हा आदिवासींच्या कलेचा, सन्मानाचा, अस्तित्वाचा आणि आदिवासी संस्कृती टिकविण्याचा हा दिन असल्याने हा दिवस संपूर्ण विश्वामध्ये संयुक्त राष्ट्र संघाने (uno) ने जाहीर केल्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव हा दिवस आपल्या संस्कृतीत साजरा करतात. 
[ads id='ads1]
त्यामुळे दि. ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी मागणी अखिल भारतीय विकास परिषदेने निवेदन देऊन केली आहे. या दिवसी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली तर विश्वातील सर्व आदिवासी समाज बांधवांना या दिवशी हा सण साजरा करता येईल.

यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष लकी जाधव यांच्या नेतृत्वाखाली व प्रमुख उपस्थितीत निवेदन देऊन सकारात्मक चर्चा करण्यात आली त्याप्रसंगी के. ए. ग्रुप चे अध्यक्ष संदीप गवारी, छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठान चे अध्यक्ष निलेश जुंदरे उपस्थित होते.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️