निंभोरा बु.वार्ताहर (प्रमोद कोंडे) शेतकरी अगोदरच कोरोना संसर्गाच्या महामारीच्या वातावरणामुळे हैराण झाला असुन त्यात पाऊसाने दांडी मारल्याने वातावरण ही उष्ण झाल्याने कोरडवाहू कपाशी पीक कोमजू लागले आहे. त्यात आज सध्या परिस्थितीत पिके जगविणे शेतकऱ्याला अवघड ठरले आहे .आज उद्या पाऊस येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
[ads id='ads1]
ऊन सावल्यांचा खेळ दररोज सुरु असून वरुणराजा बरसत नाही. पाऊसाची चातक पक्षाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याला पर्याय उरलेला नाही.
यावर्षी पाऊसाने दगा दिल्यामुळे सोयाबीन, उडीद, ज्वारी उत्पादनात मोठी घट येणार असेच चित्र सद्या दिसून येत आहे.
ऑगस्ट त्यात श्रावण महिना सुरु झाला तरीही वरूण राजा बरसत नसल्याने परिसरात दुष्काळाचे सावट दिसत आहे. पाऊस पुरेशा प्रमाणात नसल्याने पिके करपण्यास तसेच त्यांची वाढ खुंटण्यास सुरुवात झाली आहे.
गारबर्डी धरणात जेमतेम पाण्याचा साठा दिसून येत आहे. यामुळे सावखेडा, चिनावल, उटखेडा, कुंभारखेडा,रोझोदा, खिरोदा, वडगांव, विवरा, वाघोदा, निंभोरा, बलवाडी, तांदलवाडी, दसनूर, सिंगनूर, खिर्डी,ह्या गावातील शेतकरी मंडळी निराश झाली आहेत. ही गावे सुकी नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत.
गारबर्डी धरण भरलेकी त्याच्या विसर्गामुळे सुकी नदीला पूर येतो. त्यामुळे जलपातळी वाढून विहीर ट्यूबवेल धारकांना त्याचा फायदा होतो.यंदा त्यावरही पाऊस नसल्याने विरजण पडले आहे . सदर शेतकरी चिंतातुर झाल्याचे दिसून येत आहे.