मराठा व कुणबी विद्यार्थ्यानी ‘सारथी’मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन...

जळगाव - छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणेमार्फत मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी (अराजपत्रित) गट-ब (PSI-STI-ASO) पदांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण प्रायोजित करण्यात आले आहे. त्यासंबंधीची जाहिरात सारथी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
[ads id='ads1]
  महाराष्ट्र राज्यातील अनेक होतकरु विद्यार्थी राज्यसेवेत आपले भविष्य घडविण्याचे स्वप्न पाहतात. परंतु अनेकवेळा आर्थिक पाठबळ व कोचिंग अभावी होतकरु व हुशार विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या रिंगणातून बाहेर पडतात. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी अनेकवेळा आर्थिक विवंचनेमुळे शिक्षण पूर्ण करु शकत नाहीत. त्यामुळे लक्षित गटातील विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्यसेवा क्षेत्रात सक्षम व उच्चशिक्षीत अधिकारी घडविण्याकरिता सारथीमार्फत एमपीएससी (अराजपत्रित) गट-ब (PSI-STI-ASO) ऑनलाईन स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण आयोजित केले आहे.

  या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी सारथी मार्फत 13 ऑगस्ट, 2021 पर्यंत अर्ज मागविण्यात आले असून यासाठी विद्यार्थी कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने तज्ञ मार्गदर्शकांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड कागदपत्रे पडताळणीव्दारे करण्यात येईल.

  तरी सारथी ने उपलब्ध करुन दिलेल्या नि:शुल्क प्रशिक्षणाच्या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन यश प्राप्त करावे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी https://sarthi-maharashtragov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. असे आवाहन अशोक काकडे, व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️