डॉ.नसीमा तडवी सामाजिक बांधिलकी जोपासत ग्रामीण भागात किशोरवयीन मुलींसाठी राबवत आहे उपक्रम

यावल (सुवर्ण दिप वृत्तसेवा) तालुक्यातील सावखेडासिम प्रा. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तथा सामाजिक कार्यकर्त्या डॉ. नसीमा तडवी यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत किशोरवयीन ( ११ ते १९ वर्ष वयोगटातील ) मुलींना योग्य व शास्त्रीय मार्गदर्शनाची गरज ओळखून ग्रामीण भागात गावागावात जाऊन विशेष मार्गदर्शनपर शिबिर घेऊन एक सुत्य असा उपक्रम राबवित आहेत.परसाडे या गावात कोविड नियमांचे पालन करून शिबीर घेण्यात आले.

किशोरवयीन वयोगटातील मुला-मुली मध्ये शारीरिक व मानसिक बदल होत असतात. या दरम्यान त्यांना अनेक प्रश्न व शंका निर्माण होत असतात. परंतु आपल्या समाजात लैंगिक ह्या विषयावर मोकळेपणाने बोललेच जात नाही. पालक व शिक्षक ही ह्या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसून येत नाही. व त्यांच्या मनातील प्रश्न व शंकाचे समाधान होत नाही. परिणामी लैंगिक विषयावर असलेला गैरसमजुती वाढीस लागून त्याचे मानसिक व शारीरिक आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची भीती असते. आजचे विद्यार्थी हे उद्याचे तरुण असतील. त्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य हे निरोगी व सशक्त असायला हवे. म्हणून किशोरवयीन वयोगटातील मुला-मुलींना योग्य व शास्त्रीय मार्गदर्शनाची गरज ओळखून डॉ.नसीमा तडवी गावागावात जाऊन किशोरवयीन मुलींसाठी हा उपक्रम राबवित आहेत.परसाडे येथे गावात मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. शिबिरास मोठ्या संख्येने आदिवासी मुलीं सहभागी झाल्या होत्या. डॉ. नसीमा तडवी यांनी उपस्थित किशोरवयीन मुलींना आरोग्यविषयक समस्या, वैयक्तिक स्वच्छता, होणारे शारीरिक बदल व मासिक पाळी विषयी समस्या आदी विषयाबाबत आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. व मुलींच्या शंका व समस्या जाणून घेऊन त्याचे निरसन केले. तर काही मुलींसोबत त्यांच्या आई (माता) सुद्धा आलेल्या होत्या त्यांनीही मुलींच्या समस्या सांगितल्या त्यांच्या ही शंका व समस्यांचे निराकरण डॉ. तडवी यांनी केले.[ads id="ads2"] 

   यावेळी आलेल्या सर्व किशोरवयीन मुलींची मोफत रक्त (H.B.) तपासणी करण्यात आली. व आवश्यकतेनुसार सर्वांना लोह आणि कॅल्शियम ची मोफत औषधी देण्यात आली. तसेच डॉ. तडवी यांच्याकडून किशोरवयीन मुलींसाठी नाश्ता  व्यवस्थाही करण्यात आली होती. कार्यक्रम आयोजित केल्या बद्दल माता व किशोरवयीन मुलींनी डॉ. तडवी यांचे आभार व्यक्त केले.डॉ. नसीमा तडवी या नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत समाज उपयोगी कामे करीत असतात. कोरोना च्या दुसऱ्या लाटे च्या काळात सर्वसामान्य जनतेला लॉकडाउन चा फटका बसलेला होता. या परिस्थितीत डॉ. नसिमा तडवी यांनी सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले लसुन बर्डी या आदिवासी पाड्यात गरीब व गरजू आदिवासी बांधवांना (कुटुंबांना) जीवनावश्यक अशा किराणा किटचे वाटप केले होते. तर काही दिवसापूर्वीच त्यांनी लोहारा येथील मज्जितला इन्वर्टर भेट दिला होता. त्यांच्या या अशा सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आरोग्य सेविका मेहमूदा तडवी , गटप्रवर्तक  सरला तडवी,आरोग्यसेवक भुषण पाटीसंजय तडवी, अंगणवाडी सेविका संगीता तडवी आशासेविका,हिराबाई तडवी,फरीदा तडवी,समीर तडवी,सायरा तडवी यांनी यशस्वीरित्या नियोजन व आदींचे सहकार्य लाभले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️