कडेगाव - तालुक्यातील तोंडोली गावच्या रहिवाशी व जि.प.केंद्रशाळा नेवरीच्या वरिष्ठ मुख्याध्यापिका सौ.शोभा खलिपे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण करुन पर्यावरण बचावाचा संदेश दिला. सौ.शोभा खलिपे यांचे व्यक्तिमत्व समाजशील आहे. त्या विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. या अगोदर त्यांनी आरोग्य शिबीर, कोविड योद्धयांचा सन्मान, गरजूंना अत्यावश्यक साहित्य तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिले आहे.
[ads id='ads1]
रुद्राक्षा फौंडेशनच्या मार्गदर्शिका म्हणुन त्यांनी विविध उपक्रमांना दिशा दिली आहे. समाजात सामाजिक जागृती करण्यासाठी प्रभात फेऱ्या, प्रबोधन अशा माध्यमातुन त्यांनी समाजाला विधायक मार्ग दाखविला आहे. शिक्षिका म्हणुन त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडवले आहे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्र निर्माणाची बिजे रोवली आहे. त्यांचे व्यक्तिमत्व हे अष्टपैलु स्वरुपाचे आहे. गरजु सामाजिक मागासलेल्या लोकांसाठी समाजातील घटकांना वेळोवेळी सामाजिक कार्यातुन आधार देण्याचे काम केले आहे.
या वाढदिवसाच्यानिमित्ताने त्यांनी निसर्ग संवर्धनाची भुमिका बजावली आहे. येणाऱ्या काळात अशाच पध्दतीने अभिनव उपक्रमाच्या माध्यामातुन वाढदिवस साजरा करण्याचा संदेश त्यांनी समाजाला दिला आहे.
यावेळी सौ.शोभा खलिपे, शुभंकरोती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अमरदिप खलिपे, सचिव श्रीकांत खलिपे, सामाजिक कार्यकर्ते गोरखनाथ औंधे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोशल मीडिया अध्यक्ष संदेश जाधव, रुद्राक्षा फौंडेशनच्या सचिव सौ.पूजा खलिपे, सुषमा औंधे, आरुषी औंधे, आरव औंधे, इंद्रनील खलिपे आदि मान्यवर उपस्थित होते.