सौ.प्रतिभा पाटील यांना नारीशक्ती पुरस्कार...

रावेर वार्ताहर (विनोद तायडे) जनता शिक्षण मंडळ सभागृह खिरोदा ता.रावेर येथे दिनांक ७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचा पत्रकारांना मोफत हेल्मेट वाटप व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.सरस्वती बहुउद्देशीय महिला मंडळ,शिंदखेडा या माध्यमातून यांचे सामाजिक कार्य आरोग्य सेवा बद्दल असलेले कार्य व महिला गृह उद्योगसाठी केलेल्या कार्याबद्दल सौ प्रतिभा अरुण पाटील यांना नारीशक्ती पुरस्कार देण्यात आला.
[ads id='ads1]
इतरही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध व्यक्तींना पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्रवीण सपकाळे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पत्रकार संघ, किशोर रायसाकडा खानदेश विभागीय अध्यक्ष, प्रदीप गायके ग्रामीण जिल्हाध्यक्ष पत्रकार संघ ,डिगंबर महाले उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष पत्रकार संघ हे होते. यावेळी प्रास्ताविक उत्तर महाराष्ट्र पत्रकार संघ अध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी केले, सुत्रसंचालन प्रा.दिलीप सोनवणे यांनी तर आभार रावेर तालुक्याचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अध्यक्ष विलास ताठे यांनी केले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️