Jalgaon Breaking - अनुसूचित जाती उपयोजनेतंर्गत व्यायामशाळा विकास अनुदानाकरीता प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन...

जळगाव -  जिल्हा नियोजन समिती, जळगावमार्फत उपलब्ध अनुदानातून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांचेकडून अनुसूचित जाती उपयोजनेतंर्गत व्यायामशाळा विकासासाठी सन 2021-22 मध्ये अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. फक्त अनुसूचित जाती (एस.सी) संवर्गासाठी कार्यरत अशा सर्व शासकीय संस्था संचलित अनुदानित शाळा/कनिष्ठ महाविद्यालये/वस्तीगृहे, ज्यांना शिक्षण विभागाने/ समाजकल्याण विभागाने मान्यता दिली आहे. अशा संस्थांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे 30 सप्टेंबर, 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे आवाहन मिलींद दिक्षित, जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
[ads id='ads1]
  शिक्षण विभागाने/समाजकल्याण विभागाने मान्यता दिली आहे अशा संस्था तसेच ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिकांनी त्यांच्या क्षेत्रातील अनुसूचित जातीच्या वस्ती, वाडी या ठिकाणची लोकसंख्या कमीत कमी 500 अथवा ज्या अनुदानीत शाळा/महाविद्यालय/वस्तीगृहे यांच्याकडे शासकीय नियमानुसार 1 हजार स्वेअर फुट जागा उपलब्ध आहेत ते अनुदानासाठी प्रस्ताव करु शकतात. व्यायामशाळा विकास योजनेतंर्गत संस्था/शाळेच्या नावे 1 हजार स्वेअर जागा व सातबारा उतारा किंवा दुय्यम निबंधक विभाग यांच्याकडे नोंदणीकृत 30 वर्षाच्या कराराने असलेली जागा आहे. तसेच कमीत कमी 500 लोकसंख्या असलेल्या वाडी याकरीता प्रस्ताव दाखल करण्यास पात्र असतील. 

  या योजनेतंर्गत व्यायामशाळा बांधकामाकरीता रुपये 7 लाख किंवा अंदाजपत्रकीय रक्कमेच्या अनुदानापैकी जी रक्कम कमी असेल ती अनुदान म्हणून देण्यात येईल. त्यानंतर व्यायामशाळा साहित्याकरीता 7 लाख अथवा अंदाजपत्रकीय रक्कम यापैकी कमी असलेले अनुदान देण्यात येईल. व्यायामशाळा बांधकामाचे अंदाजपत्रक तयार करतांना शासन निर्णयानुसार 500 स्वेअर फुट हॉल, पुरुष/महिला चेजींग रुम, टॉयलेट ब्लॉक व कार्यालय इ. बाबी घेणे आवश्यक राहिल.

अनुसूचित जाती उपयोजनेतंर्गत सन 2021-22 यावर्षासाठी अनुदान मागणीचे प्रस्ताव मागविण्यात येत असुन या योजनेचा लाभ/फायदा घेवू इच्छिणाऱ्या फक्त अनुसूचित जाती (एस.सी) संवर्गातील लाभार्थीकरीता कार्यरत अशा सर्व शासकीय संस्था संचलित अनुदानित शाळा/कनिष्ठ महाविद्यालये/वस्तीगृहे ज्यांना शिक्षण विभागाने समाजकल्याण विभागाने मान्यता दिली आहे.

 स्थानिक स्वराज्य संस्था यांनी अनुदान मागणीचे प्रस्ताव सादर करणे संदर्भात अर्जाचा विहित नमुना व अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे दिनांक 30 सप्टेंबर, 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत संपर्क साधून त्याच कालावधीत परिपूर्ण प्रस्ताव ऑनलाईन jalgaonsports.in या वेबसाईट वर अपलोड करुन व अपलोड केलेल्या प्रस्तावाची प्रिंट काढून ती प्रत मुळ कागदपत्र असलेला प्रस्ताव असे दोन प्रतीत यादीनुसार योग्य त्या कागदपत्रांच्या पुर्ततेसह सादर करावेत. असे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. दिक्षित यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️