महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई तर्फे खिरोदा येथे पत्रकारांना मोफत हेल्मेट वाटप व मुकनायक व जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा 2021 कार्यक्रम संपन्न

रावेर (सुवर्णदिप वृत्तसेवा) तालुक्यातील खिरोदा येथे डी.एड.कॉलेज सभागृहात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे पत्रकारांना मोफत हेल्मेट वाटप व मुकनायक , जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरस्कार जीवन गौरव पुरस्कार 2021 दिलीप रत्नाकर वैद्य, सुरेश जगन्नाथ पाटील, मुकनायक पुरस्कार देवलाल पाटील, दत्तात्रय बाजीराव पाटील, लेखणी सम्राट पुरस्कार कृष्णा बाजीराव पाटील, स्तंभलेखक पुरस्कार दिपक पुंडलिक नगरे, ज्ञानपीठ पुरस्कार राजेंद्र भागवत भारंबे, तसेच युवा नेता पुरस्कार छोटू पाटील ( दिनेश गंभीर पाटील ), कोरोना योद्धा पुरस्कार डॉ. आर. के. महाजन, शिक्षक रत्न पुरस्कार प्रदीप विश्वनाथ पाटील, आदर्श व्यावसायिक पुरस्कार इमरान खान अमानउल्लाखान रावेर. सुपर बॅटरी, 
[ads id='ads1]
युवा उदयोजक पुरस्कार युगंधर जितेंद्र पवार, दत्त ठिंबक फैजपुर, कृषी रत्न पुरस्कार विपीन विजय राणे, विवरे बु. सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार छोटुलाल मांगीलाल चव्हाण,पाल.आदर्श व्यक्तीगत पुरस्कार जे.आर.पाटील,मोरगांव.जलक्रांती पुरस्कार सावखेडा ग्रुप, आदिवासी रत्न पुरस्कार लियाकत तडवी लोहारा.तसेच पत्रकारीतेत विशेष पुरस्कार प्रमोद कोंडे, लक्ष्मण ठाकुर सर, सद्दाम पिंजारी, या सर्वांना महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकुर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.
या वेळेस बोलतांना मंत्री यशोमती ठाकुर म्हणाल्यात कोरोना काळातही पत्रकारांची महत्वाची भुमिका आहे, पत्रकार हा देशाची ताकद असुन लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे.यावेळी इतर ही विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणा-यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पत्रकारांना पुरस्कार वितरण व मोफत हेल्मेट वाटप मंत्री यशोमती ठाकुर, आ.शिरीष चौधरी, आ.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार चंद्रकांत पाटील, आ.विनायकराव देशमुख,प्रविण सपकाळे,किशोर रायसाकडा, प्रदीप गायके, डिगंबर महाले, विनोद कोळी,महिला पत्रकार नाजनीन शेख, व इतर सर्व मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक उत्तर महाराष्ट्र पत्रकार संघ अध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी केले,

तर सुत्रसंचालन दिलीप सोनवणे तसेच आभार रावेर तालुका महाराष्ट्र पत्रकार संघ अध्यक्ष विलास ताठे यांनी मानले, कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व रावेर पत्रकार संघाच्या सहका-यांनी परिश्रम केले यांत विशेष कार्यभार विलासजी ताठे,संतोष नवले,योगेश सैतवाल,सद्दाम पिंजारी,महेंद्र पाटील यांचा होता.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️