निंभोरा ता.रावेर (प्रमोद कोंडे) बलवाडी-तांदलवाडी या ५ कि.मी.अंतर असलेल्या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी काटेरी झुडपे व गवत मोठया प्रमाणात वाढले होते. या विषयी साप्ताहिक सुवर्ण दीप ने बातमी दिली होती.
या रस्त्याने शेतकऱ्यांचा तसेच वाहनधारकांचा मोठा प्रमाणात वापर असून केळीची सुद्धा ट्रकद्वारे याच रस्त्याने वाहतूक केली जाते.नेहमी या रस्त्याने वर्दळ असते आधीच रस्ता अरुंद असून दोन्ही बाजूने काटेरी झुडपे रस्त्यात आल्याने अडचणी वाढल्या होत्या. त्यामुळे समोरून येणारी वाहने एकमेकांना दिसत नव्हती.
हा रस्ता रावेर शहराला जाण्या येण्यासाठी मुख्य रस्ता आहे.त्यामुळे मोठया प्रमाणात लहान मोठी अवजड वाहने या रस्त्यावरून जात असून वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे समोरून येणारी वाहने एकमेकांना दिसत नाहीत. अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तसेच साईड देण्यास जागा शिल्लक राहत नसल्याने अनेक वेळा किरकोळ स्वरूपाचे अपघात होत असतात. आजूबाजूच्या गावातील केळी व्यापारी,शेतमजूर यासह प्रवासी वाहने, वाहनधारक या रस्त्याने निंभोरा, खिर्डी, ऐनपूर यासह अनेक गावांना ये - जाकरत असतात.