ॲनिमल राहत आणि वन्यजीव प्रेमी संस्थेची यशस्वी कामगिरी.
सोलापूर (वार्ताहर) रोजी नारायण काशीद या शेतकऱ्याचा कर्देहळ्ळी या गावातून दुपारी ०१ :०० वाजेच्या सुमारास ॲनिमल राहत संस्थेतील सोमनाथ देशमुख यांना फोन आला की एक साप त्यांच्या घराजवळील विहिरी मधे कालरात्रीच्या वेळी पडला आहे आणि तो पाण्यामध्ये फिरत आहे. सोमनाथ देशमुख यांनी तात्काळ ही माहिती ॲनिमल राहत संस्थेच्या डॉ. आकाश जाधव यांना कळवली आणि त्या शेतकऱ्याचा भ्रमण ध्वनी ही पाठवून दिला.
डॉ. जाधव यांनी शेतकऱ्याला फोन करून पूर्ण माहिती विचारली आणि एक व्हिडिओ व्हॉट्स ॲप वर पाठवण्यास सांगितले. व्हिडिओ पहिल्या नंतर लक्षात आले की हा घोणस जातीचा सर्प आहे. तात्काळ डॉ. जाधव यांनी फोन करून वन्यजीव प्रेमी संस्थेतील प्रवीण जेऊरे यांना संपर्क साधला आणि त्यांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच प्रवीण जेऊरे ॲनिमल राहत च्या ऑफिस मध्ये आले आणि ॲनिमल राहत चे सर्व सदस्य डॉ राकेश कुमार चित्तोरा, भीमाशंकर विजापूरे सोमनाथ देशमुख घटना स्थळा कडे रवाना झाले. घटना स्थळी पोहचल्या नंतर पूर्ण परिसर निदर्शनास आले की विहीर सुमारे ६० ते ७० फूट खोल आहे.
विहिरी मधे प्रवेश करण्यासारखा मार्ग नाही आणि साप हा विषारी प्रजातीचा घोणस आहे. विहिरीच्या अगदी कोपऱ्यात दडून बसलेले सर्प हा एकदम शांत दिसत होता. त्यामुळे सर्वांनी सल्ला मसलत करून निर्णय घेतला कि पहील्यांदा आपण दोरीच्या साह्याने ट्रे टाकून साप वर येतो का पाहू नाहीतर रॅपलिंग करून खाली उतरून साप बाहेर काढू. त्या प्रमाणे सर्व सदस्य कामाला लागले पण ट्रे च्यl माध्यमातून साप काही पकडता येत नव्हता म्हणून वन्यजीव प्रेमी प्रविण जेऊरे रॅपलिंग करत विहिरी मधे उतरले आणि दोरीच्या मद्दतीने त्रिकीणी स्टिक खाली पाठविण्यात आली. स्टिक पाण्यात पडुन बुडुनये म्हणून वरुन स्टिक बांधण्यात आली.
अगदी शिताफीने पिशवीत सर्पास पकडले पकडण्याचे सर्व आधुनिक साहित्य वापरण्यात आले जेणे करुन सापास व तो पकडणाऱ्या व्यक्तीस कोणताही धोका होऊ नये. साप पकडल्या नंतर तो एका पिशवी मधे ठेवण्यात आला आणि ती पिशवी विहिरी बाहेरील सदस्यांनी बाहेर ओढून काढली आणि त्यानंतर प्रविण बाहेर आले. रेसक्यु करण्यासाठी योग्य आशा आर्दश पध्दतीचा वापर करण्यात आला .तात्काळ जवळील वनपरिसरात घोणस सापास निसर्गात मुक्त करण्यात आले. अॅनिमल राहत संस्था, सोलापूर व वन्यजीव प्रेमी संस्था सोलापूर. ह्या सदस्यांनी ही मोहिम यशस्वी केली.