जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे आवाहन
ठाणे - जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी , ठाणे आवाहन करत आहे की, वन स्टॉप सेंटर (सखी केंद्र) ही केंद्र शासनाची पुरस्कृत योजना असून आपदग्रस्त महिलांसाठी पोलीस मदत, वैद्यकीय सुविधा, मानसोपचार, समुपदेशन, कायदेशीर मदत व अनुषंगिक सर्व सुविधा एका ठिकाणी सेवायुक्त सुविधा केंद्र चालविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी विनामूल्य काम करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
संस्थेने धर्मादाय आयुक्त यांचेकडील नोंदणी प्रमाणपत्र, संस्था काळ्या यादीत नसल्याचे हमीपत्र, संस्थेचे बँक खात्यावर रु. 15,00,000/- शिल्लक असल्याचे प्रमाणपत्र / पासबुक झेरॉक्स, संस्थेस सामाजिक कार्याचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, संस्थेची घटना व नियमावलीची प्रत, संस्थेचा मागील 3 वर्षाचा सनदी लेखापाल यांचे लेखी परिक्षण अहवाल.
[ads id='ads1]
तसेच संस्था स्व:खर्चाने One Stop Center चालविणार असल्याचे हमीपत्र या अटी पूर्ण करीत असलेल्या सदरचे काम संपूर्णतया विनामूल्य कोणत्याही प्रकारचे मानधन किंवा प्रशासकीय खर्च देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी केवळ सामाजिक कार्य म्हणून संस्थेस सेवा द्यावी लागेल.
वरील अटी व शर्तीची पूर्तता करीत असलेल्या स्वयंसेवी संस्थेने विनामूल्य काम करण्याची तयारी असलेचे हमीपत्र देणाऱ्या संस्थेने 7 दिवसांच्या आत या कार्यालयास वरील कागदपत्रासह अर्ज सादर करावा. असे