गौण खनिज वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसवण्याचे आवाहन...

नांदेड (वार्ताहर) जिल्ह्यात मोठया प्रमाणात अवैध खनिजाची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. रात्री बेरात्री अवैध वाहतूक होत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होऊन अपघात घडत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील गौणखनिज वाहतूक करणाऱ्या चालक-मालकांनी आपल्या वाहनांवर तात्काळ जीपीएस यंत्रणा बसवून घ्यावी, अन्यथा अशा वाहनांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.

फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 133 नुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनासाठी जीपीएस यंत्रणा बसविण्याचे आदेश निर्गमीत केले आहेत. जिल्ह्यात तसेच प्रामुख्याने शहरात ट्रक, टिप्पर, हायवा आदी वाहनांनी गौणखनिजाच्या वाहतुकीचे नियमन करणे आवश्यक आहे. याबाबत सर्व गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी, असेही आवाहन केले आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️