सांगली वार्ताहर (अॅड बसवराज होसगौडर)
सांगली येथील ग्राहक न्यायालयात पूराचा पाणी साधारण तीन ते चार फूट पर्यंत होते. त्यामुळे न्यायालयातील टेबल खुर्च्या इत्यादी खराब झाले असल्याचे ग्राहक न्यायालयाचे प्रबंधक श्री एन बी कुनाळे यांनी सांगितले.
[ads id='ads1]
सांगली महानगरपालिकाने पूराचा अंदाज आदीच वर्तवल्याने उपाय योजना म्हणून ग्राहक न्यायालयचे अध्यक्ष मा. श्री मुकुंद दाते, प्रबंधक श्री एन. बी. कुनाळे, सहाय्यक लेखाधिकारी श्री. के.एल. पाटील, इतर कर्मचारी श्री सरक, वैभव पाटील, सौ भोसले, श्री. चाळके पी.बी, सौ. काकडे, सौ. भोई सर्वांनी मिळून शुक्रवारी दिनांक 23 जुलै रोजी सर्व इलेक्ट्रिक साहित्य, सर्व रेकॉर्ड फाइल्स, साधारण सहा ते सात फुटावर ठेवले होते.
दिनांक 27 जुलै कार्यालय उघडले असता तीन ते चार फुटापर्यंत पाणी होते. पुराचे पाणी साधारण तीन ते चार दिवस होते. त्यामुळे लाकडी टेबल खुर्च्या इत्यादी खराब झाले असल्याचे प्रबंधक श्री एन बी कुनाळे यांनी सांगितले.