भारतीय डाक विभागासोबत काम करण्याच्या सुवर्णसंधीचा होतकरू तरुण, तरुणींनी लाभ करून घ्यावा - डाक अधीक्षक ए.जी.पाखरे

अलिबाग,जि.रायगड : केंद्र सरकारच्या ग्रामीण डाक जीवन व डाक जीवन विम्याच्या ग्रामीण व शहरी क्षेत्रांमध्ये विमा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी आता सुशिक्षित तरुण, तरुणींना त्यासोबत वय 18 ते 50 वर्षामधील सर्वाना उपलब्ध झाली आहे.यासाठी डाक विमा प्रतिनिधी (डायरेक्ट एजंट) म्हणून निवड प्रक्रिया रायगड डाक विभागात सुरु करण्यात आली आहे.
[ads id='ads1]
     विमा प्रतिनिधींची नेमणूक अधीक्षक डाकघर,रायगड विभाग, अलिबाग यांच्यामार्फत थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी अर्ज पाठविताना उमेदवाराने सोबत जन्मतारखेचा दाखला, शैक्षणिक पात्रता, आधार कार्ड, पॅनकार्ड, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी तसेच या क्षेत्रातील अनुभव असल्यास त्याबाबतची कागदपत्रे पाठवावीत. पाच हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या भागात राहणारा उमेदवार हा 10 वी पास असावा तसेच पाच हजार व त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भागात राहणारा उमेदवार हा 12 वी पास असणे आवश्यक आहे.

     कोणत्याही कंपनीचे माजी विमा प्रतिनिधी/ माजी जीवन विमा सल्लागार, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ सदस्य-कर्मचारी, स्वयंसेवी संघटना चालक, माजी सैनिक, निवृत्त शिक्षक, बेरोजगार/ स्वयंरोजगार असणारे तरुण, तरुणी किंवा वरील पात्रता असणारे इच्छुक उमेदवार अर्ज पाठवू शकतात. इच्छुक उमेदवारांना विमा पॉलिसी विक्रीचा अनुभव, संगणकाचे ज्ञान, स्थानिक भागाची पूर्णत: माहिती असणे अपेक्षित आहे. उमेदवाराची निवड 10 वी, 12 वी च्या गुणांवर तसेच उच्च शैक्षणिक पात्रता व मुलाखती मिळालेल्या गुणांवर केली जाईल.
[ads id='ads2]
      तरी इच्छुक उमेदवाराने रायगड विभागात काम करण्यासाठी आपले अर्ज रजिस्टर/स्पीड पोस्टद्वारे साध्या कागदावर शैक्षणिक पात्रता व संबंधित प्रमाणपत्राच्या प्रतिसह लीफाफावर डाक जीवन विमा/ग्रामीण डाक जीवन विमा एजंटची नियुक्ती“ असे लिहून अधीक्षक डाकघर रायगड विभाग, अलिबाग 402201 यांच्या नावे अर्ज दि.20 जुलै 2021 पर्यंत या कार्यालयास मिळतील असे पाठवावे.उशिरा आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. निवड झालेल्या उमेदवारास रु.5 हजारची अनामत ठेव ठेवावी लागेल. या क्षेत्रामध्ये त्यांच्या कामाचा मोबदला कमिशन स्वरूपात दिला जाणार आहे.            
        भारतीय डाक विभागासोबत काम करण्याची सुवर्णसंधीचा लाभ होतकरू तरुण, तरुणींनी करून घ्यावा, असे आवाहन रायगड डाक अधीक्षक श्री. ए.जी. पाखरे यांनी केले आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️