रावेर (प्रमोद कोंडे) - नुकताच प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केलेल्या युवा सेना पदाधिकारी अविनाश पाटील यांची पदाचा दुरुपयोग केल्याचे कारणावरून शिवसेना नेते तथा जिल्हा संपर्क प्रमुख विलास पारकर यांनी सुमारे सात दिवसापूर्वीच हकालपट्टी केली होती त्यामुळे त्याचा युवासेना तसेच शिवसेना यांचेशी काहीही संबंध नसल्याचे एका निवेदना व्दारे रावेर तालुका युवासेना प्रमुख प्रवीण पंडीत यांनी कळविले आहे
[ads id='ads1]
युवासेना जिल्हाअध्यक्ष असेले अविनाश पाटील यांचे विषयी अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या यात अवैध धंदे वाले यांचे कडून खंडणी मागणे, अवैध वाळू उत्खनन करणे यासह अनेक तक्रारी येत असल्याने शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख विकास पारकर यांनी याची दखल घेत अविनाश पाटील यांना सात दिवसा पूर्वीच युवासेना जिल्हाअध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली होती त्यामुळे त्याचा सध्या शिवसेना व युवासेना यांचेशी काहीही संबंध नाही तसेच त्यांचे सोबत जे कार्यकर्ते होते त्यांचा देखील पक्षाशी काही संबंध नसल्याचे एका पत्रकाव्दारे रावेर युवासेना तालुका प्रमुख प्रवीण पंडीत यांनी निवेदनाव्दारे कळविले आहे तसेच अविनाश पाटील यांचा युवासेना व शिवसेना यांचेशी गेल्या सात आठ दिवसा पासून काहीही संबंध नसल्याने ते कोणत्या पक्षात गेले याचा आम्हाला काही देणे घेणे नसून पक्षाने त्यांना अवैध काम करण्याचे करणा वरून आधीच पक्षातून त्यांची हकालपट्टी केली असल्याचे कळविले आहे