"बिबट्याचे पिल्लू विकणे आहे, असे सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या व्यक्तीस अटक"

सातारा वार्ताहर(अ‍ॅड बसवराज होसगौडर) आज शुक्रवार दि.23.07.2021 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून वनविभाग कराड यांनी धाड टाकून संशयीत ऋषीकेश शामराव इंगळे उर्फ लाल्या याला आज वसंतगड ता. कराड येथे अटक केली. ऋषीकेश शामराव इंगळे उर्फ लाल्या मूळ रा.म्हसवड सध्या रा. वसंतगड ता.कराड ह्याने सोशल मीडियावर फेसबुकवर  बिबट्याचे पिलू विकणे आहे अशी जाहिरात केली. त्यात पुढे त्याने ज्यांना हवे असेल त्यांनी व्हाट्सएपच्या फोन वर कॉल करा किंमत सांगू असे लिहिले. हे पोस्ट वायरल झाली. सदर गोपीनिय माहिती मिळताच वनविभागाने तात्काळ हालचाल करून सदर आरोपीच्या सोशल मीडियावर असलेली  सर्व माहीत गोळा केली, तसेच इतर सूत्रांकडून त्याबद्दल माहिती काढली. 

सदर कारवाहीसाठी डी. बी.चे ऐ. पी.आय. श्री किशोर धुमाळ यांनी मोलाची मदत करून आरोपीचे लोकेशन बद्दल माहिती दिली. सदर सर्व माहितीच्या आधारावर सहायक वनसंरक्षक विलास काळे, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनरक्षक रमेश जाधवर, वनरक्षक खटावकर, वनरक्षक अशोक मलप, व चालक सकटे यांनी ऋषीकेश शामराव इंगळे उर्फ लाल्या यास वसंतगड येथे त्याच्या सध्या राहत असलेल्या घरातून ताब्यात घेतले. त्याचे मोबाईल जप्त करण्यात आले आहे.  त्याच्याकडे अधिक चौकशी करण्यात येत आहे. आरोपीस उद्या शनिवार दि.24.07.2021 सकाळी 11 वाजता कराड येथे कोर्टात हजर करण्यात येणार असल्याचे वन विभागकडून सांगण्यात आले आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️