पाचोरा (वार्ताहर) आज दि 19 जुलै 2021 रोजी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ पाचोरा शाखेच्यावतीने रॅली काढून बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले व शेवटी मा. कैलास चावडे साहेब तहसीलदार पाचोरा यांच्याशी चर्चा करून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले, आणि 7 मे 2021 रोजीच्या शासन निर्णयाचा निषेध करण्यात आला या शासन निर्णयानुसार एस सी, एसटी,व्ही जे एन टी, एसबीसी च्या पदोन्नतीतील 33% आरक्षणाला स्थगिती देण्यात आलेली आहे म्हणून संघटनेच्यावतीने एस सी, एसटी, व्ही जे एन टी, एस. बी. सी. च्या पदोन्नतीतील 33% आरक्षणची मागणी करण्यात आली
[ads id='ads1]
तसेच ओबीसीला देखील पदोन्नतीत आरक्षण देण्याची, मराठा व मुस्लिम आरक्षण लागू करण्याची, OBC ची जातनिहाय जनगणना करण्याची, नोकरीतील रिक्त पदे भरण्याची, NEET (मेडिकल कॉलेज प्रवेश परीक्षा)च्या ऑल इंडिया कोट्यातील OBC च्या रद्द केलेल्या 11027 जागा OBC ना आरक्षित करण्याची, अन्यायकारक कृषी कायदे रद्द करण्याची, असंघटित कामगारांना कामगार कायद्याचे संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. जरनेल सिंग विरुद्ध एल एन गुप्ता ह्या केस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने देखील पदोन्नतीतील आरक्षण हे मूलभूत अधिकारात असून सरकार पदोन्नतीत आरक्षण देऊ शकत असा 2018 मध्ये निर्णय दिलेला आहे त्यामुळे उच्च न्यायालयाचा निर्णय आपोआप व्यपगत होतो, तरी मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आ. उद्धव ठाकरे यांनी शिवराय, फुले, शाहू ,आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचार।ला बांधील राहून 7 मे 2021चा शासन निर्णय त्वरित रद्द करून बहुजन कर्मचार्यांना न्याय द्यावा.
[ads id='ads2]
याप्रसंगी आर एम बी के एस संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी विलास भास्कर पाटील, एस डी भिवसने, ज्ञानेश्वर पाटील, एम एन न्युज चे निलेश पाटील, व्ही एस भिवसने,भारत मुक्ती मोर्चा चे प्रसिद्धीप्रमुख, मा नंदलाल आगारे, प्रा. सलीम कासम पिंजारी, राजेंद्र पांडुरंग पाटील(एसटी महामंडळ), राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे तालुका अध्यक्ष मा जाकीर मुस्तफा तडवी, गफूर फकीरा तडवी, BMP चे तालुकाध्यक्ष. सुनील आनंद शिंदे, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तालुकाध्यक्ष मा. हमीद रशीद शाह, अल्ताफ खलील पटेल, रहीम बिस्मिल्ला तडवी सर,कास्ट्राईब संघटनेचे तालुकाध्यक्ष मा राकेश नामदेव सपकाळे, राष्ट्रीय संत रविदास क्रांती मोर्चाचे किशोर रमेश डोंगरे, विद्यार्थी प्रतिनिधी दिनेश लालचंद पाटील, राष्ट्रवादी मागासवर्गीय सेल चे जिल्हा उपाध्यक्ष मा. ए. बी. अहिरे सर, ग्रामीण पत्रकार संघाचे विभागीय सचिव भीमराव आनंदा खैरे उपस्थित होते. आजच्या या मागणीला, म रा अत्यंत पिछडा वर्ग राज्य उपाध्यक्ष मा दीपक आदिवाल, तसेच इंडियन लॅ।यर असोसिएशन चे तालुकाध्यक्ष ऍडव्होकेट अनिल पाटील, राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष भास्कर दाभाडे पाटील, एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा सुधाकर वाघ, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे जिल्हाध्यक्ष मा रणजित तडवी पदवीधर शिक्षक संघटनेचे मा सुभाष देसले सर यांनीदेखील पाठिंबा दिला आहे.