हॉकी मैदानासाठी जागेचे प्रस्ताव वन विभागाकडे सादर करावे - पालकमंत्री सुनिल केदार..

वर्धा : नालवाडी ग्रामपंचायत क्षेत्रातील झुडपी जंगल असलेल्या असलेल्या तीन एकर जागेवर क्रिडा विभागाच्या वतीने हॉकी मैदान तयार करण्यात येणार आहे. यासाठी क्रिडा विभागाने महसूल विभागाकडे सदर जागेच्या मागणीचे प्रस्ताव सादर केले आहे. परंतु सदर जागा वन विभागाची असल्यामुळे महसुल विभागाने सदर जागेचा मागणी प्रस्ताव वन विभागाकडे सादर करण्याच्या सूचना राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुनिल केदार यांनी दिलेत.
 [ads id='ads1]
         जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागाच्या आढावा बैठकित ते बोलत होते. यावेळी आमदार रणजित काबंळे, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, उप वनसरंक्षक राकेश शेपट, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, जिल्हा क्रिडा अधिकारी लतिका लेकुरवाळे, कामगार उपायुक्त, जिल्हा सरकारी कामगार अधिकारी श्री. भगत आदी उपस्थित होते.  

          जिल्ह्यात हॉकी या राष्ट्रीय खेळाला अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी आणि यामाध्यमातून जिल्ह्यात उत्कृष्ट हॉकी खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी पालकमंत्री यांनी जिल्ह्यात हॉकी मैदान तयार करण्याच्या सूचना जिल्हा क्रीडा अधिकारी यांना दिल्या होत्या. 

        हॉकी मैदानासाठी प्रस्तावित केलेल्या जागेचा मुद्दा सोडविण्यासाठी पालकमंत्री यांनी यासाठी संबंधित विभागाची विशेष बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी जागा महसूल विभागाची नसल्यास सदर प्रस्ताव वनविभागाकडे पाठविण्याच्या सूचना दिल्यात. तसेच वन विभागाने प्राप्त होणाऱ्या प्रस्तावाला लवकरात लवकर मान्यता देऊन जागा उपलब्ध करून द्यावी असेही सांगितले. जागा उपलब्ध होताच क्रीडा विभागाने मैदान तयार करून घ्यावे आणि उत्तम खेळाडू तयार होण्यासाठी हे मैदान आणि मार्गदर्शक उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्यात. 
         यासोबतच महिला आर्थिक विकास महामंडळाला कार्यालय तसेच प्रशिक्षण केंद्राकरीता नगर पालिका क्षेत्रात असलेली पाच एकरची जागा उपलब्ध करुन देण्यासाठी महसुल विभागाकडे प्रस्ताव सादर केलेला आहे. सदर प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांनी मंत्रालयास परवाणगी करीता पाठविण्याच्या सूचनाही श्री केदार यांनी यावेळी दिल्यात.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️