सातारा जिल्ह्यात ५२ शाळांची घंटा वाजणार शिक्षण विभागाची माहिती :सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव

सातारा : 'राज्य शासनाने COVID-19 मुक्त गावांमध्ये इयत्ता ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत नुकताच सर्व्हे करण्यात आला. संबंधित गावांमध्ये एक महिना कोरोनाबाधित रुग्ण न आढळल्याने जिल्ह्यातील ५२ गावांमध्ये शाळा सुरू होणार आहेत. 'ग्रामपंचायत स्तरावर सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करावी, अशा सूचना केल्या होत्या.
[ads id='ads1]
 समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी कमीत कमी १ महिना संबंधित गावात कोरोना रुग्ण आढळून आला नसावा अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागामार्फत केला आहे. याचा अहवाल शाळेच्या मुख्याध्यापकांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे सादर केला आहे. जिल्ह्यातील ८ वी ते १२ वी वर्ग असलेल्या ८३० शाळा आहेत. तसेच ऑनलाईन माहिती ४७० शाळांनी भरली आहे. शाळा सुरू करण्याबाबत ग्रामपंचायतीच्या सभेत चर्चा होवून ठराव झालेल्या शाळांची संख्या ५१ आहे.
[ads id='ads2]
 ग्रामपंचायत स्तरावर सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ५३ शाळांनी समिती गठित केली आहे. शाळेच्या गावात एक महिना कोरोना बाधित 66 शिक्षण विभागाने सर्व्हे केला असून या गावांमध्ये १ महिन्यापासून कोरोना बाधित एकही रुग्ण सापडला नाही. त्यामुळे या गावातील शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. त्याबाबतचा अहवाल शिक्षण विभागामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे. प्रभावती कोळेकर शिक्षणाधिकारी जिल्हा परिषदेतून. रुग्ण सापडला नाही अशी जिल्ह्यात ४६ गावे आहेत. जिल्ह्यात प्रत्यक्ष सुरू झालेल्या शाळांची संख्या ५२ आहे. शिक्षण विभागाने याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. यावर जिल्हाधिकारी काय निर्णय घेणार? याकडे लक्ष लागून राहिले आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️