ठाणे : मुंबई-आग्रा महामार्गावरुन एच.पी. कंपनीचा रिकामा गॅसचा टॅंकर तुर्भे येथे गॅस भरण्यासाठी जात होता. आटगाव जवळ भरधाव वेगात असताच या टँकरचा टायर फुटल्यामुळे गॅस टँकर चालकाचे गाडीवरुन नियंत्रण सुटले व गॅस टँकर मुंबई-आग्रा महामार्गावरुन डिव्हायडर तोडून थेट आटगाव जवळ रेल्वे रुळावर जाऊन धडकला.
[ads id=ads1]
यासंबंधी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांना माहिती कळल्यावर लगेच त्यांनी संबंधित फायर ब्रिगेड यांना सूचना देऊन ताबडतोब रुळावरील टँकर हटविण्याच्या सूचना दिल्या फायर ब्रिगेड यांनी रात्रीउशिरा संबंधित टैंकर यशस्वीपणे बाजूला करून होणारा अनर्थ टाळला
सदरील टॅकर रेल्वेरुळावर धडकण्याच्या 20 मिनिटांआधी एक लोकल गेली होती.सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर आपघाताची माहिती मिळताच निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून तात्काळ उपाय योजना केल्याने मोठाअनर्थ टळला आहे.
[ads id='ads2]
वाहन रुळावरुन काढले. त्यानंतर रेल्वे वाहतूक पुन्हा सुरु झाली. ट्रॅफिकचा अवधी जास्त असल्याने एसटी बसेसद्वारे रस्ते वाहतूक होऊ शकली. कल्याण, कसारा मधील स्थानकांवर अडकलेल्या प्रवाशांची व्यवस्था करण्यात आली जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, निवासीउपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांचे आभार प्रवाशांनी मानले .