"सापा सोबत स्टंट करणारा सर्पमित्रला अटक"

शहापूर वार्ताहर (अ‍ॅड बसवराज होसगौडर) तालुक्यातील खर्डी येथे दिनांक १५/०७/२०२१ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरुन श्री.आकाश कृष्णा वाटाणे यांनी वन्यजीव ( संरक्षण ) अधिनियम १९ ७२ अन्वये प्रतिबंधित असलेले Schedule II , part - II , Sr.No.09 धामण ( Dhaman or rat snake ) Sr.No.11 नाग ( Indian Cobras ) या प्रजातीच्या सापांबरोबर व्हिडीओ शुट करणे , स्टंट करणे , हाताळणे , प्रदर्शन करणे या कृती केल्याने वन्यजीव ( संरक्षण ) अधिनियम १९७२ चा भंग केल्याने आरोपी श्री .आकाश कृष्णा वाटाणे यांना चौकशीकामी ताब्यात घेवून रात्री ०८.०० वाजता अटक करण्यात आली व वैद्यकीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र खर्डी या ठिकाणी वैद्यकीय तपासणी करुन घेतली . 
[ads id='ads1]
आज दिनांक १६/०७/२०२५ रोजी आरोपी श्री . आकाश कृष्णा वाटाणे वय २२ वर्ष रा . पंचशिलनगर खर्डी ता . शहापुर जि . ठाणे यास मा . न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग शहापूर यांचे समोर हजर करत केले असता आरोपीस ३०/०७/२०२१ पर्यंत न्यायालयीन कोठडी देणेत आली .
[ads id='ads2]
सदरची कारवाई मा.डॉ. श्री भानुदास पिंगळे , उपवनसंरक्षक ( वन्यजीव ) ठाणे तसेच श्री . दिपक लडकु मते , सहाय्यक वनसंरक्षक ( जंकास ) शहापुर ( तानसा अभयारण्य ) यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली श्री . दर्शन विजय ठाकुर , वनपरिक्षेत्र अधिकारी ( वन्यजीव ) खर्डी यांचे नेतृत्वात श्री . नंदकिशोर दत्तात्रय सोनावणे , वनपाल खर्डी , श्री . गणेश भांगरे , श्री . पंढरीनाथ नागरगोजे , श्री . जगन राठोड , श्री . मच्छिद्र आघाव , श्री . विनोद लबडे , श्रीमती . प्रिया वरकुटे , वनरक्षक यांनी केली .


जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️