तुळशीदास जाधव यांच्यासोबत गणपतराव देशमुख यांनीही स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. त्यामध्ये त्यांना कारावासही भोगावा लागला होता. १९४८ मध्ये शेतकरी कामगार पक्षाची त्यांनी स्थापना केली. त्यासोबत विद्यार्थी सभा स्थापन केली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही त्यांनी भाग घेतल्यामुळे त्यांना तुरुंगवास पत्करावा लागला. [ads id='ads1]
१९६२ मध्ये शेतकरी कामगार पक्षातर्फे त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली व प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. सन १९७८ ते १९८० या काळात पुलोद सरकारमध्ये कृषी व ग्रामविकास खात्याचे कॅबिनेट मंत्री , तर आघाडी सरकारच्या काळात सन १९९९ ते २००२ मध्ये वनवरोजगार हमी मंत्री ही मंत्रिपदे भूषविली. ते विधिमंडळ सभागृहात बोलायला उभे राहिले की , भल्या भल्या मंत्र्यांची भंबेरी उडायची. टेंभू , म्हैसाळ योजनेचे पाणी सांगोल्याला आणण्यासाठी त्यांनी भगीरथ प्रयत्न केले. त्यांनी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली.
कापसाला हमीभाव देण्यासाठी स्वत:च सांगोला तालुका शेतकरी सहकारी सूत गिरणीची स्थापना करीत ती उत्तमपणे चालवून दाखविली. त्याच जोरावर मोदी लाटेतही २०१३ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेने सांगोल्यातून आमदार म्हणून त्यांना संधी दिली होती. गेल्या २०१८ च्या निवडणुकीत मात्र त्यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कुटुंबातील कोणालाही, संधी देणार नाही,
असेही जाहीर केले होते. परंतु कार्यकर्त्यांनी त्यांचे नातू डॉ . अनिकेत देशमुख यांना उमेदवारी देऊन निवडणुकीच्या मैदानात उतरविले. त्यांचा थोडक्यात पराभव झाला होता. वयाच्या ९४ व्या वर्षीही ते लोकहितासाठी सक्रिय होते. नेहमीच एसटी आणि रेल्वेने प्रवास करणारा आमदार म्हणूनही त्यांच्याबद्दल राज्यातील नागरिकांना नेहमीच कुतुहूल वाटायचे. त्यामुळेच त्यांच्या साधी राहणीमानाची नेहमीच चर्चा व्हायची. माणदेशाच्या माळावर गुराढोरांच्या संगतीत राबणाऱ्या माणसाचा नेता अशी त्यांची ख्याती होती. सांगोला तालुक्यासाठी उजनी धरणातून पाणी आणण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला होता. त्यांच्या संघर्षामुळेच सांगोल्याला उजनीचे पाणी मिळू शकले.
तसेच मला सोशल मीडियावर त्यांचं एक पत्र मिळाला ते पुढीलप्रमाणे होता दिनांक ३१-१२-२०१७ रोजी पोस्ट कार्डने कु. प्रेरणा विष्णू गवळी हिने, पेनुर ते मोहोळला जाण्यासाठी सकाळी ७.०० ते ८.१५ च्या दरम्यान दुसऱ्या बसला थांबा देण्याबद्दलचे पत्र देशमुख यांना लिहिले. त्यावेळी ते अधिवेशनासाठी नागपूर येथे होते.
त्यानुसार त्यांनी लगेच आगारप्रमुख पंढरपूर यांना फोन वरून पेनुर येथे दुसऱ्या बसला थांबा देण्याबद्दलच्या सूचना दिले. त्याप्रमाणे सकाळी ८.०० ची पंढरपूर - सोलापूर बस उद्यापासून पेनुर येथे थांबेल. जर बस नाही थांबली तर मला थेट फोनव्दारे कळवावे असे त्यांच्या लेटर हेड पत्रावर पत्र लिहून कु. प्रेरणा विष्णू गवळीला दि. ०९.०१.२०१८ रोजी कळवला. इतकं साधा सरळ निस्वार्थ जनतेचा नेता, तळागळातील व्यक्ती सोबत नातं निर्माण करणारे गणपतराव देशमुख यांचा वयाच्या 94 वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले.
असे नेते समाजात खूप दुर्मिळ आहेत.. सांगली लगत सोलापूर आहे.. मला यांच्या कार्याविषयी आधी समजले असते किंवा माझ्या वाचण्यात आला असतं तर यांची जरूर भेट घेतली असती.. दुर्दैवाने आता ही भेट कायमची मुकली..याचं खंत मला नेहमी असेल.. असे नेता पुन्हा होणे नाही... आदरपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास चीरशांती लाबो ही निसर्गचरणी प्रार्थना..
- अॅड बसवराज होसगौडर, सांगली (मुक्त पत्रकार ) 8208792809