क्रोनिक न्युमोनिया ने बिबट्याचा मृत्यु ; ऊसाच्या सरीमध्ये बर्याच काळ तळमळत होता बिबट्या..

कराड वार्ताहर (अ‍ॅड बसवराज होसगौडर) आज दि . २७/०७/२०२१ रोजी कराड वनपरिक्षेत्रातील मौजे साजुर येथील शेत मालक श्री.अनिल चव्हाण यांचे गट नं .३६७ मध्ये, शेतमालक जनावरांसाठी चारा काढत असताना ऊसाच्या सरीमध्ये बिबट्या तडफडत असतांना आवाज आला . बिबट्याला पाहताच शेतमालक ओरडत घराकडे / गावाकडे पळाले . त्वरीत गावातील काही लोक हातात काटया घेऊन शेताकडे आले. 

परंतु बिबटया जागेवरच पडून होता .तडफडत होता . तेव्हा काही गावकऱ्यांनी प्राणी मित्रांना फोन लावले . त्यातील प्राणीमित्र रोहीत कुलकर्णी यांनी मानद वन्यजीव रक्षक सातारा जिल्हा श्री . रोहन भाटे यांना फोन वरुन माहिती दिली . व त्यांनी त्वरीत सहा . वनसंरक्षक श्री . विलास काळे यांना कळविले . त्वरीत शासकीय वाहनात पिंजरा चढवून वनरक्षक मलकापूर श्री . रमेश जाधवर , वनरक्षक कोळे श्री . राठोड त्वरीत घटनास्थळाकडे रवाना झाले .तोपर्यंत प्राणीमित्र व रोजंनदारी वनमजूर श्री.मयुर जाधव गमेवाडी , श्री . रोहीत कुलकर्णी त्वरीत घटनास्थळी हजर होऊन बिबटयाची पाहणी केली . तेव्हा बिबटया जागेवरच तडफडत होता . थोडयाच वेळात वनअधिकारी व श्री . रोहन भाटे जागेवर पोहचले .

बिबटया मृत पावला होता. शरीराचे तापमान जास्त होते .त्यास उचलुन कराड येथे पशुधन विकास अधिकारी / तथा सहा . आयुक्त , पशुधन विकास विभाग यांचे दवाखाण्यात आणुन शवविच्छेदन केले . बिबट्याच्या कफ्फुसास मोठया प्रमाणात जवळ जवळ ८० % संसर्ग झाल्याने क्रोनिक न्युमोनिया ने बिबट्याचा मृत्यु झाला. कराड वनकार्यालयात मा. सहा . वनसंरक्षक , सातारा व पशुधन विकास अधिकारी यांच्या आदेशाने दहन करण्यात आले . सदर कार्यवाही मध्ये मा .सहा .वनसंरक्षक सातारा श्री .विलास काळे , मा . वनक्षेत्रपाल कराड श्री . अर्जुन गंबरे , मानद वन्यजीव रक्षक सातारा जिल्हा श्री . रोहन भाटे , वनपाल मलकापूर श्री . ए . पी . सवाखंडे , वनपाल कोळे श्री . बाबुराव कदम , वनरक्षक मलकापूर श्री . रमेश जाधवर , वनरक्षक कोळे श्री . राठोड , वनरक्षक तांबवे मंगेश वंजारे . आवश्यक कागदपत्रे तयार केली . पंचनामा केला . पुढील तपास चालु आहे. 

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️