निंभोरा बु वार्ताहर (प्रमोद कोंडे)रावेर तालुक्यातील निंभोरा बु. प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सुरु असलेल्या लसीकरण केंद्रावर अधिकारी, कर्मचारी वेळेवर येत नाही. सकाळ पासून नागरिकांना ताटकळत उभे रहावे लागते,लसीकरणासाठी टोकन पद्धतीत नियोजन नसल्याने गोंधळ निर्माण होऊन नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो.लसीकरण केंद्रावर किती लसी उपलब्ध आहेत, याबाबतची कोणतीही माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जाहीर केली जात नाही.
[ads id='ads1]
त्यामुळे लसीकरण केंद्रावर जवळ जवळ दोन तीनशेच्या वर नागरिक सकाळ पासून नंबर लावून उभे असतात. ही संख्या जर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केली तर मोठया प्रमाणात होणारी गर्दी टाळता येऊ शकते. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रशासनाचा नियोजन शून्य कारभाराचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
निंभोरा आरोग्य परिसरातील चार ते पाच गावातील नागरिक लसीकरण करण्यासाठी येत असतात.कोरोना प्रतिबंधक लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने लस आली तेव्हा आरोग्य केंद्रावर गर्दी होऊन गोंधळ निर्माण होतो.ऑनलाईन बुकींग करून ही टोकन गर्दी मुळे भेटत नाही.
नागरिकांना टोकन देतांना गोंधळ होऊन सकाळ पासून रांगा लावलेले नागरिक लसीकरण करण्यापासून वंचित राहतात.टोकन गेट मधूनच देण्यात यावे,व एका व्यक्तीस एकच टोकन देण्यात यावे,व लसींची संख्या जाहीर करावी असा नागरिकांचा सुर आहे.