माझ्या हातात सत्ता द्या मी ओबीसी आरक्षण देतो असे फडणवीस कशाच्या आधारे म्हणतात ? - रेखाताई ठाकुर

संघटन समीक्षा बैठकीत ओबीसी आरक्षणावर वंचितच्या नेत्या रेखा ठाकूर यांनी नोंदवले मत 
चंद्रपूर (वार्ताहर) भाजपाचे महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी "माझ्या हाती महाराष्ट्राची सत्ता द्या! मी तीन महिन्यात ओबीसींना आरक्षण मिळवून देतो" हे विधान केले. कायद्यानुसार जनगणना हा विषय Indian census act 1948 नुसार पूर्णतः केंद्र सरकारच्या अधीन आहे व केंद्रात भाजपाचे सरकार आहे. देवेंद्र फडणवीस हे भाजपा कडे असलेल्या केंद्रातील सरकारकडे ओबीसीच्या जनगणनेसाठी आग्रह धरण्याऐवजी सत्तेची त्यांची हौस भागवण्यासाठी ओबीसी समुदायाची नेहमीप्रमाणे दिशाभूल करत आहेत.

 2021 हे जनगणनेचे वर्ष आहे या वर्षी जनगणना होणे क्रम:प्राप्त आहे परंतु अजूनही केंद्र सरकारने ओबीसी जनगणनेचा निर्णय घेतलेला नाही. उलट देवेंद्र फडणवीस ओबीसींना खरेच न्याय देऊ इच्छित असतील तर त्यांनी केंद्र सरकारकडे ओबीसी जनगणनेची मागणी केली पाहीजे व केंद्र सरकारने अध्यादेश काढून 2021 च्या जनगणने मध्ये एससी, एसटी सोबत ओबीसीच्या जनगणनेची तरतूद केली पाहिजे. 

परंतु तसे न करता पुन्हा मुख्यम॔त्री होण्याच्या उतावीळपणा पोटी फडणवीस ओबीसी समुदायाला फसवणारे युक्तिवाद करत आहेत. या अगोदर देवेगौडा सरकारने एकमताने ओबीसी जनगणनेचा घेतलेला निर्णय तेरा दिवसांच्या वाजपेयी सरकारने रद्द केला होता व 2011 मध्ये संसदेने एक मताने घेतलेला निर्णय काँग्रेसच्या केंद्रातील सरकारने बदलवून Cast Swwag या नावाखाली Indian census Act 1948 ला बाजूला करून NGO मार्फत जात गणना करण्यात आली व त्यावर 4800 कोटी रुपये खर्च केले. तो Swwag 2014 नंतरही मोदी सरकारने 2015 पर्यंत सुरू ठेवला. ज्या Swwag ने हा डाटा तयार केला आहे त्यामध्ये 9 कोटी चुका आहेत 

 व त्यामुळेच तो निरुपयोगी आहे असे वक्तव्य फडणवीस करत आहेत. खरे तर Indian census Act 1948 च्या अंतर्गत तयार न केल्यामुळे तो जाहीर करण्याचे घटनात्मक बंधन सरकारवर नाही त्यामुळे तो बासनात बांधण्यात आला. कारण तो जाहीर झाल्यास ओबीसीच्या मागासलेपणाची वस्तुस्थिती समोर येईल. महाराष्ट्र सरकारने 2019 च्या पावसाळी अधिवेशनात ठराव करून केंद्राने त्याचा एम्पिरिकल डाटा द्यावा अशी विनंती केली आहे, जी मान्य होण्याची शक्यताच नाही हे लक्षात घेता महाविकास आघाडी सरकारही ओबीसींना फसवत आहे हे उघड आहे.
[ads id='ads2]
        संघटन समिक्षा व संवाद यात्रेच्या निमित्ताने वचिंतचे उपाध्यक्ष मा. गोविंद दळवी यांनी संघटना बांधणीवर ज़ोर देत कार्यकर्ता आढावा घेतला व महिला सरसचिटणीस शिरसाट ताई यांनी महिला संघटन बांधणिसाठी महिलाना संबोधित केले. या कार्यक्रमात विदर्भ पदाधिकारी डॉ. रमेश गज़भे, कुशल मेश्राम, राजु झोडे, अरविंद सांदेकर, राजु लोखंडे उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना वंचित चे जिल्हाअध्यक्ष डॉ. गावतूरे यांनी केली तर संचालन जयदिप खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले .

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️