चौघांवर निलंबनाची कारवाई मंगळवारी केली आहे. उत्पादन शुल्क विभागाचे राज्याचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी ही कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली
नटराजवरील कारवाईमुळे बी विभागाला अभय
मुंबई/ठाणे : डान्सबार (Dance bar) प्रकरणात आता पोलिसांपाठोपाठ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन दुय्यम निरीक्षकांसह चौघांवर निलंबनाची कारवाई मंगळवारी केली आहे. उत्पादन शुल्क विभागाचे राज्याचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी ही कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे येथील नौपाडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील आम्रपाली (Amrapali) आणि अँटीक पॅलेस तसेच वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील नटराज या 3 बारमध्ये COVID-19 चे सर्व नियम धुडकावून बारबाला Dance करीत असल्याचे प्रकरण समोर आले होते.
[ads id='ads2]
याचीच दखल घेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आदेशाने ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंह यांनी वर्तकनगर आणि नौपाडा या दोन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निलंबित केले.
तर दोन सहायक पोलीस आयुक्तांची मुख्यालयात बदली केली. या कारवाई पाठोपाठ राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आणि उपअधीक्षकांवरही कारवाईची मागणी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्कचे आयुक्त कांतीलाल उमप यांनी ठाण्यातील उत्पादन शुल्कच्या ए विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या आम्रपाली (FL-3) अँटीक पॅलेस या बारवरील कारवाईत हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत बिट एकचे दुय्यम निरीक्षक बजरंग पाटील आणि जवान सुरेंद्र म्हस्के तसेच अँटीक पॅलेस या बारच्या कारवाईत हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत बिट दोनचे दुय्यम निरीक्षक प्रदीप सर्जने आणि जवान ज्योतिबा पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
कोविड नियमांच्या पालनाची अंमलबजावणीमध्ये पालन न करणे आणि कारवाईच्या जबाबदारीमध्ये अक्षम्य हेळसांड केल्याचा ठपका या अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. या चौघांच्या निलंबनाबरोबर त्यांची अन्य जिल्यांमध्ये उचलबांगडीही केली आहे. निलंबनाच्या कालावधीमध्ये दुय्यम निरीक्षक बजरंग पाटील आणि जवान म्हस्के यांना रायगड जिल्हयाच्या अधीक्षक कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. तर दुय्यम निरीक्षक प्रदीपकुमार सरजिने आणि जवान पाटील यांनी निलंबन कालावधीमध्ये पालघर अधीक्षकांच्या कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे.
नटराजवरील कारवाईमुळे बी विभागाला अभय
रात्री उशिरापर्यंत नटराज बार चालू ठेवल्यामुळे बी विभागाचे निरीक्षक शिवशंकर पाटील यांनी या बारवर कारवाई केली होती. त्यामुळेच निलंबनाच्या कारवाईतून बी विभागाच्या अधिकारी आणि कर्मचार्यांना अभय मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली.