अलिबाग, जि.रायगड - पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील ग्रामीण स्तरापर्यंतच्या विविध शासकीय यंत्रणा बळकट करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यापैकी पशुवैद्यकीय दवाखान्यांना प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेली कार्यवाहीदेखील प्रलंबित होती. मात्र पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या विषयाबाबत गांभीर्याने पावले उचलत पशुवैद्यकीय दवाखान्यांसाठी शासकीय जमिनी देण्याची कार्यवाही अत्यंत तत्परतेने सुरू केली आहे.
[ads id='ads1]
त्याचबरोबर पशुवैद्यकीय दवाखान्यांसाठी असलेल्या जागांची योग्य निवड व पाहणी करून पशुवैद्यकीय दवाखाने कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही सुरू करण्याबाबतीतही त्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पेण तालुक्यातील येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 कामार्ली या इमारतीच्या बांधकामासाठी शासकीय जमिनीची मागणी होती, याबाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.
[ads id='ads2]
त्यानुसार मौजे कामार्ली, ता.पेण, जि.रायगड येथील गट क्र.65/1 येथील क्षेत्र 0-36-70 हे.आर. या सरकार महाराष्ट्र शासन म्हणून नमूद असलेल्या शासकीय जमिनीमधील 0-02-0 हे.आर. इतकी जमीन भोगाधिकार मूल्यरहित व महसूल मुक्त किंमतीने कब्जाहक्काने जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, रायगड-अलिबाग यांच्याकडे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 कामार्ली करिता हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी नुकतेच जारी केले आहेत.पेण तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला पशुवैद्यकीय सुविधा मिळण्याच्या दृष्टीने हा लोकोपयोगी निर्णय घेण्यात आला आहे.